घरमहाराष्ट्रजाधववाडी धरणात बुडून तिघांचा मृत्यू

जाधववाडी धरणात बुडून तिघांचा मृत्यू

Subscribe

उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्यातील जाधववाडी धरणात पोहायला गेलेल्या तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून हे तिघेही मुंबई येथे राहणारे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्याच्या धरणात बुडून मुंबईच्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या तळेगाव एमआयडीसी येथील जाधववाडी धरणात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धरणात बुडालेले तिघेही मुंबईचे राहणारे असल्याचे समजते. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या निमित्ताने पाहुण्यांच्या घरी आलेल्या नातेवाईकांवर काळाने झडप घातली आहे. या मृत्यूमध्ये एका सात वर्षाच्या मुलाचा देखील समावेश असल्याची माहती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनिल कोंडीबा कोळसे (५८), प्रितेश रघुनाथ आगळे (३२) आणि प्रशिल अमोल आढाव (७) यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेले सर्व घाटकोपर येथे राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर संगीता दादासाहेब गायकवाड, उत्कर्षा दादासाहेब गायकवाड, स्वप्नील दादासाहेब गायकवाड आणि दादासाहेब पोपट गायकवाड अशी बचावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खेड तालुक्यातील येलवाडी येथे राहणारे स्वप्नील दादासाहेब गायकवाड यांच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टी निमित्ताने घाटकोपर येथून हे पाहुणे आले होते. त्याच्यासह एकूण सात जण नवलाख उमबरे गावच्या हद्दीतील जाधववाडी धरण येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्यातील काहीजण धरणातील पाण्यात उतरले. त्यातील अनिल कोंडीबा कोळसे यांचा पाय घसरल्याने त्यानी त्यांच्या मागे उभे असलेले दादासाहेब पोपट गायकवाड आणि प्रशिल अमोल आढाव यांना पकडले असता ते दोघेही पाण्यात पडले. त्यांना वाचवण्यासाठी प्रितेश रघुनाथ आगळे हे गेले. मात्र, ते ही पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी सोबत असलेल्या संगीता दादासाहेब गायकवाड आणि उत्कर्षा दादासाहेब गायकवाड या गेल्या. परंतु, त्या ही बुडू लागल्याचे पाहून आणि आरडाओरडा ऐकून शेजारी चालू असलेल्या एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी त्यांना बाहेर काढले. मात्र प्रशिल अमोल आढाव, अनिल कोंडीबा कोळसे, प्रितेश रघुनाथ आगळे यांना वर काढून तातडीने तळेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला. तर चार जणांना बचावण्यात यश आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -