घरमहाराष्ट्रनाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून तीन जणींना जिवंत जाळले

नाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून तीन जणींना जिवंत जाळले

Subscribe

नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून तीन जणींना जिवंत जाळल्याची घटना फुलेनगरमध्ये घडली आहे. पहाटे ४ वाजता झोपेत असलेल्या तीन जणींना रॉकेल टाकून जिवंत जाळण्यात आले. यामध्ये ९ महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून प्रियकराने तिघांना जिवंत जाळले. या घटनेमध्ये ९ महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर दोन जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाशिकच्या फुलेनगर भागामध्ये पहाटे ४ वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान पंचवटी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

रॉकेल टाकून दिले पेटवून

नाशिकच्या फुलेनगरमध्ये राहणाऱ्या संगीता देवरे या महिलेचे त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या परप्रांतीय जलाउद्दीन खान याच्याशी प्रेमसंबंध होते. या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वादविवाद सुरु होता. काल रात्रीसुध्दा यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. संगीता देवरे, त्यांची मुलगी प्रिती शेंगडे आणि प्रितीची मुलगी सिध्दी हे रात्री झोपले होते. पहाटे ४ च्या दरम्यान जलाउद्दीनने या तिघींच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवून दिले.

- Advertisement -

फरार आरोपीचा शोध सुरु

या घटनेमध्ये प्रितीची मुलगी सिध्दीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर संगीता आणि प्रिती या गंभीररित्या भाजल्या आहेत. दोघींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संगीताचा प्रियकर आरोपी जलाउद्दीन फरार झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात तक्रार दाखल करुन घेतली असून पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे नाशिक परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -