Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुंबई अहमदाबाद महामार्गावर तीन ट्रक पेटले, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

मुंबई अहमदाबाद महामार्गावर तीन ट्रक पेटले, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

अग्निशमन दलाच्या एक गाडी त्वरित घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करित आहेत.

Related Story

- Advertisement -

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन कंटेनर आणि एका ट्रक चा भीषण अपघात झाला आहे. विरार हद्दीत सकवार पेट्रोल पंपासमोर आज पहाटे साडे तीन च्या सुमारास गुजरात लेनवर हा अपघात झाला आहे. मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या वाहनांच्या एक ते दोन किलोमीटरवर वाहतूक ठप्प झाली आहे. अग्निशमन दलाची एक गाडी त्वरित घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करित आहेत.

- Advertisement -

या अपघातात एक ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही. दोन कंटेनर चा अपघात झाल्या नंतर पूट्ट्याने भरलेला ट्रक अपघातग्रस्त कंटेनरवर जाऊन आदळला. त्यात स्पार्क होऊन तिन्ही वाहनांना भीषण आग लागून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवर एक ते दोन किलोमीटर वाहतूक ठप्प झाली आहे. तर गुजरात वरून मुंबईच्या दिशेची वाहतूक सुरळीत सुरू आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून , वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.


हेही वाचा – डोक्यात दगड टाकून मित्राचा खून

- Advertisement -