घरमहाराष्ट्र'रागाने का बघतोस', असे म्हणून टोळक्याने केली वाहनांची तोडफोड

‘रागाने का बघतोस’, असे म्हणून टोळक्याने केली वाहनांची तोडफोड

Subscribe

'रागाने का बघतोस', असे टोळक्याने पिंपरी - चिंचवडेणध्ये वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

‘आमच्याकडे रागाने का बघतो’, असे म्हणून परिसरात दहशत माजवत कोयता, दगड आणि लाकडी दांडक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना पिंपरीमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेत तीन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जावेद साबीर सय्यद, भावड्या धोतरे, वसीम साबीर सय्यद (ताब्यात) आणि इतर एक जण, असे चार आरोपी असून या प्रकरणी अभिजित मोरे यांनी पिंपरी पोलिसात फिर्यादी दिली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पिंपरीमधील खराळवाडी येथे रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ घराबाहेर थांबला असता आरोपी जावेद, भावड्या, वसीम आणि इतर एक जणाने आमच्याकडे रागाने का बघतो?, असे म्हणून त्याच्याबरोबर किरकोळ वाद घातला. त्यानंतर स्वतः फिर्यादी हे टेम्पो घेऊन आले असता आरोपी आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तुम्हाला खूप माज आला आहे, असे म्हणून त्यांच्यात मारामारी झाली. दरम्यान, परिसरात दहशत पसरवत कोयता, दगड आणि लाकडी दांडक्याने तीन वाहनांची तोडफोड केली आहे. या घटने प्रकरणी वसीमला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत पुन्हा हिट अँड प्रकरण; मुलीचा जागीच मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -