घरमहाराष्ट्रविदर्भ - मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

विदर्भ – मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Subscribe

हवामान तज्ज्ञांनी विदर्भ आणि मराठवाडाच्यामध्ये वादळी पावसाची शक्तता वर्तवली आहे. शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करण्याचे कृषि विभागांने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

हवामान हे दिवसागणिक बदलत असल्याच दिसत आहे. कधी थंडी आहे तर कधी वातावरण उष्ण आहे. ही हवामानाची अस्थिरता आपल्याला बघायला मिळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान अस्थिर असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. २० ते २१ फेब्रुवारी दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील बऱ्याच भागात सुद्धा काळ्या मेघासह पावसाची शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. विदर्भ आणि मराठवाडामध्ये या आठवड्यात तापमानामध्ये वाढ होणार आहे. तसेच या दरम्यान हवामान ढगाळ राहील आणि वादळी पावसासोबत काही प्रमाणात गारपीठ होण्याचीही शक्याता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या शक्यते वरुन शेतकऱ्यांनी हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा, बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. तसेच वादळी पावसादरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पत्र्याच्या शेडमध्ये किंवा झाडाखाली थांबणे टाळावे, असे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -