घरमहाराष्ट्रआव्हान...महाराष्ट्राची सुंदर फोटोफ्रेम बनवण्याचे

आव्हान…महाराष्ट्राची सुंदर फोटोफ्रेम बनवण्याचे

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणारे उद्धव ठाकरे हे पहिले ठाकरे आहेत. परंतु, एक राजकारणी आणि पक्षाचे प्रमुख या पलिकडे उद्धव ठाकरे हे उत्तम फोटोग्राफर आहेत. ठाकरे घराण्याला कलेची परंपरा आहे.ती परंपरा उद्धव ठाकरे यांनी देखील जपली आहे. फोटोग्राफीच्या आवडीमुळे उद्धव ठाकरे 40 वर्षे राजकारणापासून दूर राहिले.

उद्धव यांना लहानपणापासून फोटोग्राफीची आवड आहे. वाइल्ड लाइफ आणि नेचर फोटोग्राफी त्यांचे आवडते विषय आहेत. ते फोटो प्रदर्शन आणि पर्यावरणाशी निगडित कार्यक्रमांचे नेहमी आयोजन करत असतात. एका कार्यक्रमादरम्यान ते फोटोग्राफी माझ्यासाठी ऑक्सिजन आहेत,असे म्हणाले होते. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये अनेकदा उद्धव यांच्या फोटोंचे एग्जीबिशन होत असते. त्यांची छायचित्रे ‘महाराष्ट्र देशा’ नावाच्या एका पुस्तकाच्या स्वरूपात सादर केले आहेत. या पुस्तकात महाराष्ट्रातील 27 मोठमोठ्या किल्ल्यांचे एरियल व्ह्यूचे फोटो आहेत. आकाशातून किल्ल्यांचे फोटो काढण्यासाठी उद्धव यांनी सुरक्षा मंत्रालयाकडून क्लियरन्स घेतला होता. हे सर्व फोटो हेलिकॉप्टरमधून खूप उंचीवरून घेतले गेले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातील किल्ल्यांचे असे स्वरूप जगासमोर सादर करणार्‍या उद्धव यांनी दुर्ग प्रेमी संघटना देखील बनवली. याव्यतिरिक्त उद्धव यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारी यात्रेचादेखील एरियल फोटोग्राफ काढला. 2008 मध्ये उद्धव यांनी इंफ्रारेड टेक्निकचा वापर करून कॅनडाच्या हडसन बेमध्ये सुमारे शून्य तापमानामध्ये पोलर बिअर आणि कम्बोडियाच्या मंदिराचे फोटो काढले. या फोटोंमुळे ते एक प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून समोर आले. तसेच जगातील सक्रिय ज्वालामुखी, अंटार्क्टिका प्रदेश आणि माउंट एव्हरेस्ट पर्वतांच्या श्रृंखलेचे फोटो आपल्या कॅमेर्‍यात कैद करण्याची उद्धव यांची इच्छा आहे.

आता लवकरच उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारणार आहेत.राज्याच्या राजकारणात सक्रीय असताना तसेच फोटोग्राफीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला आहे.मुख्यमंत्रिपदासोबत महाराष्ट्रातील अनेक प्रश्न आणि समस्या सोडवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या पुढे असणार आहे.शेतकरी आत्महत्या,बेरोजगारी आणि ग्रामीण-शहरी प्रश्नांना योग्य तो न्याय देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.त्यामुळे पाच वर्षांनंतर विरोधी पक्षाचा सामना करत महाराष्ट्रात सुंदर छायचित्रे येण्याजोगी चांगली परिस्थिती निर्माण करण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -