घरमहाराष्ट्रउद्योगातून रायगडच्या विकासाला चालना देणार

उद्योगातून रायगडच्या विकासाला चालना देणार

Subscribe

सुभाष देसाईंचे सूतोवाच

उद्योगातून रायगड जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचे काम आगामी काळात करणार असल्याचे सूतोवाच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. पेण तालुक्यातील गणपती कारखानदारांसाठी कच्च्या मालाची निर्मिती करण्यासाठी येथे उद्योगनिर्मिती कारखाना हमरापूरजवळ काढण्यात येईल. तसेच पोयनाडजवळील धेरंड जवळील टाटा कंपनीने संपादित केलेली जी जमीन होती तेथे चिनी कंपनीचा कागदाचा कारखाना सुरू होणार आहे. त्यासाठी लागणार्‍या परवानग्या घेण्यात आल्या आहेत, असे देसाई यांनी सांगितले.

येथील वैकुंठ निवासस्थानी झालेल्या पत्रकार सुसंवाद कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रवि पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, उप जिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, शहरप्रमुख ओंकार दानवे आदी मान्यवर उपस्थित होते. खत निर्मितीचा कारखाना देखील काढण्यात येईल. कारखान्यांसाठी एकत्रित अखंड जमिनची आवश्यकता आहे. मागील काळात जे भूसंपादन झाले ते तुकड्या तुकड्यात झाले होते. यामुळे या जमिनींचे संघटीकरण करण्याच्या प्रक्रियेला वेळ गेला. परंतु आता सर्व प्रक्रिया पार पडल्या आहेत. लवकरच नवीन उद्योग निर्मिती कारखाने सुरू होतील, असे सांगून येथील शेतकर्‍यांच्या दृष्टीने पर्यावरणपूरक कारखाने निर्मितीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येतील, असे देसाई यांनी सांगितले.

- Advertisement -

नवी मुंबईच्या धर्तीवर रायगड जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत असून, येथे हायवे, रेल्वे, जलप्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. उद्योगही मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत. यातूनच मोठ्या प्रमाणवर रोजगार निर्मिती होणार आहे. येथील कारखान्यांमध्ये 80 टक्के स्थानिकांना भरती करण्यात येत असून, तसा कायदाच बनविण्यात आला आहे. यामुळे स्थानिकांची कुचंबणा होणार नाही. जर स्थनिकांना डावलून एखादी कंपनी बाहेरच्याांना भरती करीत असेल तर त्या कंपनीवर कार्यवाही करण्यात येईल.

येत्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार अनंत गीते हे मोठ्या फरकाने निवडून येणार असून, पेण मतदारसंघातून रवि पाटील यांच्यामुळ मोठी आघाडी मिळणार आहे. यामुळे गीतेंसमोर कोणतेही आव्हान आहे, असे वाटत नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा नेत्यांना जनता आपल्या मतातून त्यांची जागा दाखवून देईल, असे या वेळी देसाई यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -