‘धुरळा’ बसत नाही तोच संपतो ‘दुष्काळी दौरा’

केंद्राचं दुष्काळी पाहणी पथक सध्या राज्यातल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी आलं आहे. त्यामुळे आता मदत नक्की मिळेल अशी अपेक्षा बळीराजाला आहे.

Pune
drought
राज्यात भीषण दुष्काळ
सोलापूर, जालना, परभणी, सांगली, सोलापूर या भागात केंद्रानं पाठवलेल्या दुष्काळी पथकानं धावता दौरा केला. पण, शेतकऱ्यांची कैफियत ऐकायला मात्र या पथकाला वेळ नाही. मोडक्या, तोडक्या हिंदी भाषेत शेतकरी आपली व्यथा तर मांडतोय. पण, सरकारी बाबूंना त्यांचं हिंदी, त्यांची भाषा, त्यांची व्यथा कळतंय की नाही हे मात्र कळत नाही. काही भागातील पिकांचं नुकसान झाल्याचं पथकानं मान्य देखील केलं आहे. त्यामुळे केंद्राकडून आता किती मदत मिळणार हे पाहावं लागणार आहे. परभणीतल्या पेडगावमध्ये तर नियोजित दौरा रद्द केल्यानं शेतकऱ्यांनी पथकाचा ताफा अडवला. शेतकऱ्यांचा आक्रमकपणा पाहून पथक पेडगावात गेलं. पण, आता मदत काय मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शेतकरी मात्र एकच म्हणतोय, ‘साह्येब जी परस्थिती हाय ती मांडा म्हंजी मदत तरी येळेवर मिळलं’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here