घरमहाराष्ट्रबुलडाणा प्रकरण निषेधासाठी राजू शेट्टींचे पुण्यात आंदोलन

बुलडाणा प्रकरण निषेधासाठी राजू शेट्टींचे पुण्यात आंदोलन

Subscribe

मंत्र्यांच्या घरातील बाईकडे कोणी वाकड्या नजरेने बघितले असते, तर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला असता का? असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज राजू शेट्टी सरकार विरोधी पुण्यात भव्य आंदोलन करणार आहेत.

मंत्र्यांच्या घरातील बाईकडे कोणी वाकड्या नजरेने बघितले असते, तर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला असता का? असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यावर तोफ डागली.
बुलडाण्यात पीककर्जासाठी बँक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. याप्रकरणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर राजेश हिवसेला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी दिली. या प्रकारावरुन खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष केले.

अधिकाऱ्यांना जामीन मिळतोच कसा?

भाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज आला आहे. ते शेतकऱ्यांच्या बायकांकडे वाकडया नजरेने बघत आहेत. एवढे हिन कृत्य करूनदेखील बँक अधिकाऱ्याला एका दिवसात जामीन मिळतोच कसा? देवेंद्र फडणवीस तुमच्या घरातील बाईकडे असे कोणी वाकड्या नजरेने बघितले, तर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला असता का? आमच्या शेतकऱ्याच्या बाया काय रस्त्यावर पडल्या आहेत का? तुमचे गृहखाते काय करते? पुरावे असताना पोलिसांनी ही केस कोर्टासमोर सक्षमपणे मांडली नाही असे राजू शेट्टी म्हणाले.

- Advertisement -

सरकार विरोधात आज पुण्यात भव्य मोर्चा

या सरकारला शेतकरी पाकिस्तानपेक्षा वाईट वाटतो. शेतकऱ्याला जेव्हा चार पैसे मिळतात, तेव्हा हे सरकार शत्रूराष्ट्रासोबत हात मिळवते आणि देशातील शेतकऱ्यांना मरणाच्या खाईत लोटते. हेच का या सरकारचे देशप्रेम? असा सवाल राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला विचारला.राजू शेट्टी २९ जून पुण्यात भव्य मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा सरकारला धडकी भरवणारा असेल. शनिवार वाड्याच्या शेंडीला जाळ लागावा, यासाठी पुण्यातच मोर्चा आयोजित केला आहे. शेती व्यवसायाचे वाटोळ करणाऱ्यांना कळले पाहिजे, म्हणून हा मोर्चा आहे. भाजपसोबत गेलो याची लाज वाटते, असेही राजू शेट्टी म्हणाले.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -