घरमहाराष्ट्रएसटी कर्मचाऱ्यांचे आज आझाद मैदानावर उपोषण

एसटी कर्मचाऱ्यांचे आज आझाद मैदानावर उपोषण

Subscribe

सरकारने या उपोषणाची गंभाीर दखल घेऊन, मागण्या मान्य नाही केल्या, तर १ नोव्हेंबरपासून राज्यात विभागीय पातळीवर उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र एसटी संघटनेने दिली आहे.

सरकारने सध्या एसटी महामंडळ व्यवस्थेचे रुपांतर खाजगीकरणात करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये स्वच्छतेच्या अधिकाऱ्यांपासून ते शिवशाही बसपर्यंत खाजगीकरण झालेले बघायला मिळत आहे. यातील शिवशाही बस चालक हे महामंडळात भाडेतत्त्वावर काम करतात. एसटी महामंडळामध्ये सुरु असलेल्या या खाजगीकरणाच्या विरोधात मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळातील खाजगीकरण बंद करण्यासोबतच त्यांच्या अन्य १२ मागण्या आहेत. या मागण्यांसाठी मुंबई-पुण्यासह राज्यातील एसटी अधिकारी-कर्मचारी आज, मंगळवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत.

शिवशाहीच्या अपघातांमध्ये वाढ 

मंडळाने काही दिवसांपासून सुरु केलेल्या शिवशाही गाडीच्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. या अपघाताला पुर्णपणे मंडळाचे खासगीकरण जबाबदार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. शिवशाहीचे चालक हे भाडे तत्त्वावर काम करतात. शिवशाहीचे चालक एसटी चालकांइतके प्रशिक्षित नाहीत. शिवाय, सध्या महामंडळात स्वच्छतेसह इतर कामात खासगीकरण केले जात आहे. खासगीकरणातून स्थानकांतील स्वच्छता होत नसून उलट कंपन्यांचाच आर्थिक फायदा होत आहे. यामुळे खाजगीकरण बंद करा, अशी मागणी संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी केली आहे.

- Advertisement -

१ नोव्हेंबरपासून विभागीय पातळीवर उपोषण

सरकारच्या या खाजगीकरणाच्या विरोधात राज्यभरातून कर्मचारी आज मुंबईच्या आझाद मैदानावर येणार आहेत. सरकारने या उपोषणाची गंभाीर दखल घेऊन, मागण्या मान्य नाही केल्या, तर १ नोव्हेंबरपासून राज्यात विभागीय पातळीवर उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र एसटी संघटनेने दिली आहे.


हेही वाचा – दिवाळीत निघणार एसटी प्रवाशांचं दिवाळ

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -