Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Gold-Silver Price : सोन्याला आजही झळाली; जाणून घ्या आजचा दर

Gold-Silver Price : सोन्याला आजही झळाली; जाणून घ्या आजचा दर

सोन्या-चांदीला झळाळी मिळाली असून त्याच्या दरात वाढ

Related Story

- Advertisement -

लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्या-चांदीच्या दरात वाढ होतानाच दिसतंय. कमॉडिटी एक्सचेंज MCX वर सध्या सोनं आणि चांदीच्या दरात तेजी आहे. आज सकाळी ११ वाजता सोनं ३१८ रूपयांनी वाढून ४९ हजार ३६३ प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. सध्या सोन्या-चांदीला झळाळी मिळाली असून त्याच्या दरात वाढ होतानाच दिसतेय. एप्रिलच्या सोन्याच्या दरात ३१९ रूपयांची वाढ होऊन ४९ हजार ३५३ रूपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.

आज सकाळी MCX वर चांदीच्या दरात ५९४ रूपयांनी वाढ झाली आहे. सोन्यासह चांदीचे दर वाढले असून चांदीचा दर ६६ हजार ५०० रूपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. आज सकाळी ११.१० वाजता चांदीच्या भावात ११४ रूपयांच्या तेजीसह ६६ हजार ०२० रूपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तर मे महिन्याच्या चांदीच्या दरात वाढ होत असून त्याचा सध्याचा दर ६७ हजार १६० रूपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत सोनं ४९ हजार ५९० रूपये प्रति तोळा तर चांदी ६६ हजार ३०० रूपये प्रति तोळा असा आजचा भाव आहे. यासह जळगाव येथे सोनं ५१ हजार ४७९ रूपये प्रति तोळा तर चांदी ६७ हजार ६४८ रूपये प्रति तोळा, पुण्यात सोनं ४९ हजार ५९० रूपये प्रति तोळा तर चांदी ६६ हजार ३०० रूपये प्रति तोळा आहे. तसेच नाशिकमध्ये सोनं ४९ हजार ५९० रूपये प्रति तोळा तर चांदी ६६ हजार ३०० रूपये प्रति तोळा दर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या भावात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी वायदा भावात घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव २.२० डॉलर म्हणजे ०.०१ टक्के घटीसह १८५०.६० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी जागतिक वायदा भावात घट पाहायला मिळाली. कॉमेक्सवर चांदी मार्च, २०२१ वायदा भाव ०.०६ डॉलर म्हणजे ०.२५ टक्के वाढीसह २५.२२ डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता.

- Advertisement -