Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा कमी झालेला भाव

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा कमी झालेला भाव

गुरूवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरात घसरण

Related Story

- Advertisement -

कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमधील घसरण कायम आहे. आज गुरूवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात घट झाली आहे. आज गुरूवारी सोन्याचे दर पुन्हा घटले असून मुंबईत आज २४ कॅरेटसाठी आजचा सोन्याचा भाव ४९ हजार ४५० रुपये प्रति तोळा झाला आहे. तर चांदीचा भाव ६६ हजार रुपये प्रति किलो झाला असून चांदीचा दर देखील घसरला आहे. तर मुंबईत २२ कॅरेटसाठी सोन्याचा आजचा भाव ४८ हजार ४५० रुपये प्रतितोळा इतका आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत सोनं ४९ हजार ४५० रूपये प्रति तोळा तर चांदी ६६ हजार ००० रूपये प्रति तोळा असा आजचा भाव आहे. यासह जळगाव येथे सोनं ५१ हजार ०२१ रूपये प्रति तोळा तर चांदी ६६ हजार ९२३ रूपये प्रति तोळा, पुण्यात सोनं ४९ हजार ४५० रूपये प्रति तोळा तर चांदी ६६ हजार ००० रूपये प्रति तोळा आहे. तसेच नाशिकमध्ये सोनं ४९ हजार ४५० रूपये प्रति तोळा तर चांदी ६६ हजार ००० रूपये प्रति तोळा दर आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या भावात आठवड्याच्या चौथ्या दिवशी मंगळवारी सकाळी वायदा भावात घट पाहायला मिळाली. तर काल बुधवारी मुंबईत सोनं ४९ हजार ५९० रूपये प्रति तोळा तर चांदी ६६ हजार ३०० रूपये प्रति तोळा असा भाव होता. यासह जळगाव येथे सोनं ५१ हजार ४७९ रूपये प्रति तोळा तर चांदी ६७ हजार ६४८ रूपये प्रति तोळा, पुण्यात सोनं ४९ हजार ५९० रूपये प्रति तोळा तर चांदी ६६ हजार ३०० रूपये प्रति तोळा होतं. तसेच नाशिकमध्ये सोनं ४९ हजार ५९० रूपये प्रति तोळा तर चांदी ६६ हजार ३०० रूपये प्रति तोळा दर होता. आज सकाळी एमसीएक्सवर फेब्रुवारी महिन्यातील डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी ३९५ रुपयांनी घसरुन ४८,९१० रुपये झाला. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये सोन्याचा भाव १९६ रुपयांच्या वाढीसह प्रतितोळा ४९,२३० रुपयांवर होता. यावेळी चांदीच्या डिलीव्हरीत घट झाली आहे. मार्च डिलीव्हरीसाठी चांदीचा भाव ७२१ रुपयांनी घसरुन ६५,३०० रुपये प्रतिकिलोवर होता.

- Advertisement -