घरदेश-विदेशमहाराष्ट्रातील वीरपूत्रांवर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार

महाराष्ट्रातील वीरपूत्रांवर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार

Subscribe

शहीद जवान नितीन राठोर आणि संजय राजपूद या यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पुलवामा जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलावर (सीआरपीएफ) गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याची जवाबदारी जैश-ए-मोहमद या दहशदवादी संघटनेने घेतली आहे. या दहशदवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफ ४० जवान शहीद झाले. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. या हल्लामध्ये महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरगती प्राप्त झाली आहे. नितीन राठोर आणि संजय राजपूत ही त्या शहीद जवानांची नावे आहेत. संजय राजपूत हे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरचे तर नितीन राठोर हे लोणार तालुक्यातील आहेत.

पार्थिव औरंगाबाद येथे दाखल 

सर्व शहीद जवानांच्या पार्थिवांना दिल्ली विमानतळावर पंतप्रधानांकडून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आज ते पार्थिव जवानांच्या मूळगावी पाठवण्यात आले आहेत. नितीन राठोर आणि संजय राजपूत या दोन्ही जवानांच्या पार्थिवावर आज, शनिवारी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. एअर फोर्सच्या विशेष विमानाने या जवानंचे पार्थिव दिल्लीहून औरंगाबाद येथे आणण्यात आले असून औरंगाबाद विमानतळावरून या वीरपुत्रांचे पार्थिव बुलढाणा येथे येणार आहेत. शहीद संजय राजपूत यांच्यावर त्यांच्या मूळगावी मलकापूर येथे दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पार्थिवांच्या अंतिम दर्शनासाठी तेथील नागरिकांना एक ते दिड तास देण्यात येणार आहे. तर शहीद नितीन राठोर यांच्यावर त्याच्या मूळगावी लोणार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने ५० लाखांची मदत जाहिर केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारीही सरकारने घेतली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले मुख्यमंत्री 

या हल्ल्याविषयी मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, संपूर्ण भारत देशामध्ये या हल्ल्यामुळे उद्रेक निर्माण झाला आहे. सगळ्या जनतेच्या मनात या हल्ल्याचा राग आहे. जे जवान या हल्ल्यात शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतःला एकटं समजू नये. सव्वाशे कोटी जनता तुमचं कुटुंब आहे हे लक्षात असूद्या, कोणतीही काळजी करू नका असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. शहीद जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही, या हल्ल्याला आम्ही जशास तसे उत्तर देणार आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -