घरमहाराष्ट्रधुळे, नगर महापालिकांसाठी आज मतदान

धुळे, नगर महापालिकांसाठी आज मतदान

Subscribe

सत्ताधारी भाजप सेनेची प्रतिष्ठा पणाला

सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणार्‍या उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि अहमदनगर महापालिकांचे कारभारी निवडण्यासाठी रैवारी (दि. ९ ) मतदान होत आहे. ,महापालिका जिंकण्यासाठी साम- दाम-दंड वापरणार्‍या सत्ताधारी भाजपने दोन्ही ठिकाणी कंबर कसली असली तरी प्रबळ विरोधक भाजपाला एकहाती सत्ता मिळून देणे सोपे नसल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे.

धुळे महापालिकेच्या रणसंग्रामात आ. अनिल गोटे स्वकियांविरुद्ध शड्ड ठोकल्याने इथल्या निकालाकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे. पक्षात गुंड प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश देण्याचं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय संरक्षण राजमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल या चौकडीच्या भूमिकेत आ. गोटे यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. एव्हढ्यावरच न थांबता आपल्या पुर्वाश्रमीच्या ’लोकसंग्राम’ पक्षाच्या पुनरुज्जीवित करीत त्यांनी स्वपक्षाविरूद्ध उमेदवार उभे करून बंडाचे निशाण स्वपक्षाविरूद्ध उमेदवार उभे करून बंडाचे निशाण फडकावल्याने भाजप नेतृत्वाचा कास लागलं आहे. इथे एकूण १९ प्रभागातून ७४ मउमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. तथापि लोकसंग्रामाच्या काही उमेदवारांना शिवसेनेने तर शिवसेनेच्या निवडक शिलेदारांना लोकसंग्रमने पाठिंबा जाहीर केल्याने धुळेकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणूक काँग्रेस आघाडी मतदारांवर कितपत प्रभाव टाकते, याकडेही लक्ष लागून राहणार आहे.

- Advertisement -

नगरमध्ये भाजप- सेनेतच लढाई
अहमदनगरमध्ये १७ प्रभागात ६८ उमेदवार निवडून देण्यासाठी आज मतदान होत आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना इथे समोरा-समोर ठाकले आहेत . भाजपच्या प्रचाराची धुरा पालकमंत्री प्रा. राम शिंदे व खा. दिलीप गांधी यांच्याकडे तर सेनेची रणनीती ठरवण्याचे सर्वाधिकार उपनेते ताठ माजी मंत्री अनिल राठोड यांच्यावर सोपवण्यात अली आहे. विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे पुत्र डॉ. सुजय यांच्यासह काँग्रेस च्या विजयासाठी खिंड लढवत आहेत स्थानिक मुद्यांसह विकासाचा शब्द देत भाजपने मतदारांना आकर्षित करण्याचा मार्ग चोखाळळा आहे. मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांच्या सभा व हायटेक प्रचार हे भाजप रणनीतीची भाग राहीले तुलनेत शिवसेना तसेच काँग्रेसने पारंपरिक प्रचार फेर्‍यांचा आधार घेत मतदारांचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न केला

नगरच्या रणांगणात बिनीची भूमिका बजावू शकणार्‍या पोतकर जगताप आणि कर्डीले कुटुंबांच्या वेगवेगळ्या कारणांमुळे निर्माण झालेल्या अडचणी आणि त्यांचा प्रचार प्रक्रियेतील थंड सहभाग बहजपच्या पथ्यावर पाडण्याची चर्चा आहे सत्तेत सहभागी सेना किती जागांवर कब्जा करते हे देखी अवसुक्याचा भाग आहे. काहीही असले तरी नगरमधील लढाई भाजप सेनेतच होणार. याबाबत तरी स्थानिकांमध्ये दुमत नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -