घरलोकसभा २०१९जरा हटकेमाढाच्या निवडणुकीत टॉयलेट मॅनची एंट्री

माढाच्या निवडणुकीत टॉयलेट मॅनची एंट्री

Subscribe

माढा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आता टॉयलेट मॅन माढातून निवडणूक लढवणार आहेत.

माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार होते. मात्र त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला. परंतु, पुन्हा एकदा माढा मतदारसंघ चर्चेत आला असून तिथे टॉयलेट मॅन म्हणून ओळख असणारे उद्योजक रामदास माने हे निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘ध्यास माढा विकासाचा, आवाज सर्वसामान्यांचा’ या ब्रीद वाक्याखाली टॉयलेट मॅन रामदास माने हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्रात त्यांची ओळख मोठी आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा ते यशस्वी उद्योजक अशी त्यांची ओळख आहे. माने यांनी तब्बल २५ नववधूच्या विवाहात मोफत शौचालय देऊन एक सामाजिक संदेश दिला होता. तर महाराष्ट्रासह इतर १७ राज्यात थर्माकॉलचे तेवीस हजार शौचालय ना नफा ना तोटा यावर दिली होती. त्यामुळे माने यांची ओळख महाराष्ट्रभर झाली आहे.

नेमकं कोण आहेत टॉयलट मॅन?

माने यांचा व्यवसाय हा पिंपरी-चिंचवड शहरात असून ते मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या शेतकरी घरात सर्व जण अंगठे बहाद्दर त्यामुळे त्यांनी शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि आईकडे शिक्षणाचा हट्ट धरला. त्यांनी दहावी पर्यंत शिक्षण घेऊन आयटीआयमध्ये वायरमन ट्रेडचे शिक्षण घ्यायचे ठरवले. शिक्षण सुरू असताना रात्रपाळीला त्यांनी काम करत पैसे जमवले. चांगल्या गुणांनानी ते पास झाले. पुढे चालून ते पिंपरी-चिंचवड शहरात आले आणि स्वतःचं नशीब अजमावलं. आज ते थर्माकॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे मालक असून तीन वेळेस त्यांनी जग भ्रमंती केली आहे. आता ते माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असून त्यांना तेथील तरुणांना रोजगार देण्याचं ठरवलेलं आहे. त्यांचा हाताला काम द्यायचं आहे असं माने म्हणाले. एकीकडे ते यशस्वी उद्योजक असून त्यांना नागरिक स्वीकारतात का? हे पाहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -