दहावीचा उद्या ऑनलाइन निकाल

10th result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. हा निकाल उद्या दुपारी १ वाजेपासून मंडळाच्या संकेतस्थळावर बघता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ मंडळांमार्फत मार्च २०१८ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला सुमारे १७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवारी (८ जून) दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.

कुठल्या संकेतस्थळावर निकाल बघाल?

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

बीएसएनएलच्या ग्राहकांना एसएमएसद्वारे निकालाची सुविधा
बीएसएनएलच्या ग्राहकांना विशेष सुविधा मिळणार आहे. कंपनी एसएमएसद्वारे ग्राहकांना निकाल पाठवणार आहे. यासाठी बीएसएनएलच्या ग्राहकांनी MHSSC टाईप करुन स्पेस द्यावा यानंतर आसनक्रमांक टाईप करावा आणि ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा. त्यानंतर बीएसएनएल एसएमएसद्वारे ग्राहकांना निकाल पाठवणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here