घरमहाराष्ट्रपर्यटकांनीच तोडला तिकोणा गडावरील दरवाजा; दुर्गप्रेमींमध्ये नाराजी

पर्यटकांनीच तोडला तिकोणा गडावरील दरवाजा; दुर्गप्रेमींमध्ये नाराजी

Subscribe

दुर्गप्रेमींकडून कारवाईची मागणी

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले कित्येक महिने लॉकडाऊन असल्याने घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. यावेळी पर्यटनास देखील बंदी घालण्यात आली होती. मात्र तरी देखील पर्यटन बंदीचा आदेश मोडून रविवारी पहाटे पवन मावळातील तिकोणा गडावरील दरवाजा तोडून पर्यटक गडावर गेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे दुर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

गडावरील दरवाज्या तोडण्याची ही दुसरी घटना

कोरोनामुळे किल्ले तिकोणा गडावरील दरवाजा बंद करण्यात आला होता. तसेच पवनमावळसह मावळ तालुक्यात पुणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटन बंदीचा आदेश लागू केला असताना रविवारी पर्यटकांनी हा आदेश झुगारून किल्यावर दरवाजा तोडून प्रवेश केला. काही पर्यटकांनी रविवारी पहाटेच्या सुमारास तिकोणा गडावरील बाल किल्ल्याच्या दरवाज्याची मोडतोड करुन गडावर गेले.

- Advertisement -

दुर्गप्रेमींकडून कारवाईची मागणी

दोन वर्षांपूर्वी श्रमदानातून गडावर दरवाजा बसविण्यात आला होता. गडावरील दरवाज्या तोडण्याची ही दुसरी घटना असल्यामुळे दुर्गप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे. शिवप्रेमींसह दुर्गप्रेमींकडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बजंरग दल व सह्याद्री प्रतिष्ठाणच्यावतीने लोणावळा ग्रामीणचे उपनिरिक्षक निरंजन रनवरे यांना निवेदन देण्यात आले आहे.


सावधान! विमानाच्या आकाराइतका लघुग्रह २४ हजार KMPH वेगाने पृथ्वीकडे येतोय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -