घरमहाराष्ट्रराजगुरुनगर येथील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका

राजगुरुनगर येथील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका

Subscribe

पुणे - नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर येथे अतिक्रमणाचा विळखा झाला होता. या अतिक्रमणावर आज सकाळपासून प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. महामार्गावर असणारी दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.

पुणे | नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे अतिक्रमनावर प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या अतिक्रमणामु मोठी वाहतूक कोंडी व्हायची. तसंच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पादचारी नागरिकांना त्रास होत होता. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता आज सकाळी सहा वाजल्यापासून प्रशानसाने अतिक्रमण कारवाई सुरु केली. नगरपरिषद, महसूल, एनएचएआय विभागाने पोलिसांच्या मदतीने ही संयुक्त कारवाई सुरू केली आहे. सामान्य नागरिकाना या अतिक्रमण कारवाईमुळे वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुणे नाशिक – महामार्ग आणि भीमाशंकर राज्य मार्ग हे दोन्ही मार्गांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असा विश्वास प्रांताधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका

चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या प्रमुख शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. असे असताना रस्त्याच्या दुतर्फा असणारे अतिक्रमण त्यातुन वाहनांची पार्किंग यामुळे पुणे नाशिक – महामार्ग मोठी वाहतुक कोंडी व्हायची. त्यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल व्हायचे. आज सुरु केलेल्या कारवाईमुळे सध्या तरी प्रवासी मोकळा श्वास घेणार आहे. या कारवाई दरम्यान उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक लांडे नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान नेहमीच वाहतूककोंडीची शिकार होत चाललेला महामार्ग आता मोकळा श्वास घेणार आहे. का पुन्हा नव्याने अतिक्रमण होणार हेच पहावे लागेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -