घरCORONA UPDATECoronavirus- १४ एप्रिलपर्यंत एकही रेल्वे धावणार नाही!

Coronavirus- १४ एप्रिलपर्यंत एकही रेल्वे धावणार नाही!

Subscribe

सध्या भारतीय रेल्वे देशभरात फक्त मालवाहतूक  करणा-या गाड्या चालवित आहे. 

करोनाचा पार्श्वभूमीवर देशासह  महाराष्ट्रात भारतीय रेल्वेने सर्व प्रवासी वाहतूक २३ मार्च ते ३१ मार्चपर्यत बंद करण्यात आली आहे. मात्र मंगळवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्याही बंद राहण्यात येणार आहे.

करोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे भारतीय रेल्वेने ३१ मार्च २०२० पर्यंत देशभरातील प्रवासी रेल्वे सेवांचे कामकाज स्थगित केले आहे.  मात्र मागील काही  दिवसांपासून करोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  करोना विषाणूवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी मंगळवारी, रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस म्हणजे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. परिणामी मध्य, पश्चिम, हार्बर  मार्गावर एकही लोकल धावणार नसल्याचे रेल्वे मंडळाने स्पष्ट केले आहे. सध्या भारतीय रेल्वे देशभरात फक्त मालवाहतूक  करणा-या गाड्या चालवित आहे.  भारतीय रेल्वे आपल्या अखंडित मालवाहतूक सेवांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

सुरक्षेचा दृष्टीने घेतला निर्णय

यापूर्वी लोकल आणि लाबपल्याचा गाड्यात  होम क्वारंटाईनचे स्टॅम्प असलेले प्रवासी प्रवास करतना दिसून आले होते. इतकेच नव्हे तर रेल्वे प्रवाशाणी या सबंधित तक्रारी रेल्वेला प्राप्त झाल्या होत्या.त्यामुळे होम क्वारंटाईनचे स्टॅम्प असलेल्या प्रवाशांमुळे इतर प्रवाशानांही याची लागण होण्याच्याची भीती असल्याने देशभरातील रेल्वे सेवा 22 मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद केली होती. ही सेवा येत्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा रेल्वे मंडळाने निर्णय घेतला होता. मात्र मंगळवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्याही बंद राहण्यात येणार आहे.

रेल्वे कर्मचारी २४/७ सतत कार्यरत

देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वे  २४/७ काम करत आहे.अन्नधान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल, कांदे, फळे आणि भाज्या, पेट्रोलियम उत्पादने, कोळसा इत्यादी वस्तू रेल्वे टर्मिनल्सवर लोड केल्या जात आहेत विविध राज्यांतील लॉकडाऊनच्या परिस्थिती दरम्यान, देशातील अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी अनेक माल धक्के ( गुड्स शेड), स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांवर तैनात असलेले भारतीय रेल्वे कर्मचारी २४/७ सतत कार्यरत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -