घरमहाराष्ट्रकरोनाशी लढण्यासाठी रेल्वे सज्ज

करोनाशी लढण्यासाठी रेल्वे सज्ज

Subscribe

68 लाख करणार खर्च

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मध्य रेल्वेनेही पुढाकार घेत अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातील एक म्हणजे 570 करोना ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी तीन ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. ज्यात प्रतिबंधनात्क सर्व उपाय करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ‘करोना’ग्रस्तांसाठी उपचारासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलेला 20 डॉक्टर आणि 20 निमवैद्यकीय स्टॉफ तैनात करण्यात आला आहे. यासाठी मध्य रेल्वेला सरासरी 68 लाख रुपयांचा खर्च होणार आहे.

तसेच रेल्वेकडून प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून जनजागृती आणि अनेक कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने जमाव बंदी आणि मंंगळवारी एकूण 23 लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच युध्दपातळीवर जनजागृती करणे सुरु केले आहे.रेल्वे डॉक्टर,रेल्वे कर्मचारी आणि विशेष: रेल्वे डब्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आले आहे. तसेच रेल्वे मार्गांवरील हॉस्पिटलची नोंदणी सुध्दा रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. इतकेच नव्हे,तर विशेष म्हणजे करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मध्य रेल्वेने 570 रुग्णांची क्षमता असलेले विलगीकरण कक्ष कल्याण डीआरएच हॉस्पिटल, आरपीएफ बँकर आणि ठाकुर्ली हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आले आहे.

- Advertisement -

ज्यात अ‍ॅक्शन टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 20 डॉक्टर आणि 20 निमवैद्यकीय स्टाफ तैनात करण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त 10 करोना विषाणू प्रतिबंधनात्क किट्स उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रेल्वेने 25 खोल्यांमध्ये हे विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. ज्यात प्रत्येक खोलीत 24 खाटा आहेत.म्हणजे एक खोलीत 24 करोना ग्रस्तांवर उपचार होणार आहे.

असा होणार खर्च

- Advertisement -

मध्य रेल्वेने करोना विषाणू विरोधात पूर्ण तयारी केली आहे. तीन हॉस्पिटलमध्ये 570 करोना ग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी विलगीकरण कक्ष तयार केला आहे. 570 रुग्णांचा तीन महिन्याचा खर्च 54 लाख रुपये तर जेवणाचा खर्च हा 2.16 लाख रुपये येणार आहे. तर 12 लाख रूपये इतर खर्च मिळून एकूण 68 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

विलगीकरण कक्ष
* 570 करोनाग्रस्त रुग्णांची क्षमता
* 24 खोल्यांना विशेष कक्ष
* 10 करोना विषाणू प्रतिबंधनात्क किट्स
* 3 हॉस्पिटल्स
* 20 प्रशिक्षित डॉक्टर
* 20 निमवैद्यकीय स्टॉफ तैनात
* 90 पीपीई किट्स

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -