घरमहाराष्ट्रअवनीबाबत पोस्टमॉर्टममधून धक्कादायक माहिती समोर

अवनीबाबत पोस्टमॉर्टममधून धक्कादायक माहिती समोर

Subscribe

अवनी या नरभक्षक असलेल्या वाघिणीला ठार करण्यापूर्वी बेशुद्धीचं इंजेक्शन लागलंच नसल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

२ नोव्हेंबर रोजी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर त्याबाबत आता धक्कादायक माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली आहे. अवनी या नरभक्षक असलेल्या वाघिणीला ठार करण्यापूर्वी बेशुद्धीचं इंजेक्शन लागलंच नसल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. अवनी वाघिण नरभक्षक असल्याचं म्हणत तिला यवतमाळच्या जंगलामध्ये २ नोव्हेंबर रोजी गोळ्या घालून ठार करण्यात आलं. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अवनी अर्थात टी – १ वाघिणीला ठार करण्यापूर्वी तिला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं नसल्याचा आरोप केला जात होता. पण, संबंधित टीमनं मात्र या आरोपांचं खंडन केलं होतं. मात्र आता आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून तरी बेशुद्धीचं इंजेक्शन लागलं नसल्याचं म्हटल्यानं अवनीला ठार करणारे शिकारी आणि टीम समोरच्या अडचणी वाढल्या आहे. याप्रकरणी प्राणी प्रेमी आणि संघटनांकडून देखील निषेध नोंदवण्यात आला आहे.

वाचा – अवनीचे बछडेही नरभक्षकच होणार – शूटर

मुनगंटीवार विरूद्ध मेनका गांधी

अवनीला ठार केल्यानंतर केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केलं. शिवाय त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. त्यावरून दोन्ही मंत्र्यामधील हा वाद टोकाला गेला. सुधीर मुनगंटीवार यांनी देखील कुपोषणाचा मुद्दा पुढे करत मेनका गांधींच्या राजीनाम्याची मागणी पुढे केली. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले. पण अवनीला ठार केल्यानंतर सुरू झालेला वाद काही शमताना दिसत नाही. शिवसेना, मनसेनं देखील अवनी प्रकरणावरून सरकारला लक्ष्य करत अंबानींच्या भल्यासाठी अवनीला ठार केल्याचा आरोप केला. सोशल मीडियावर देखील याची चर्चा जोरात रंगली. पण आता समोर आलेल्या अहवालानंतर सरकार संबंधितांवर काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

वाचा – नियमानुसार अवनीला ठार केलं – मुनगंटीवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -