Corona: परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण

transoprt minister anil parab found corona positive
Corona: परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. अनिल परब यांना उपचाराकरिता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. आता यापाठोपाठ परिवहन मंत्री अनिल परब यांचा देखील अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राज्यातल्या कोरोनाबाधित मंत्र्यांचा आकडा ७ झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे दोन आणि एक अपक्ष मंत्र्यांचा समावेश आहे.

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १५ लाख २८ हजार २२६वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४० हजार ३४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून १२ लाख ६६ हजार २४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या २ लाख २१ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसं सांगावं