घरमहाराष्ट्रमुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूककोंडी

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूककोंडी

Subscribe

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असल्याने प्रवाशी हैराण झाले आहेत. खासगी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे उन्हाच्या तडाख्याने नागरिकांचा जीव अगदी मेटाकुटीला आला आहे.

सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे आणि त्यात विकेंड असल्यामुळे बरेच पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतात. मात्र याचा परिणाम मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झाल्याचे दिसून येत आहे. विकेंड असल्यामुळे अनेक पर्यटक बाहेर फिरायला गेले असून यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अनेक खासगी वाहने मुंबई – पुणे महामार्गावार आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. या महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या असून त्यात कडक उन्हाळ्यामुळे नागरिक देखील प्रचंड हैराण झाले आहेत.

वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात दत्तवाडी ते अमृतांजन पुलांपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. सकाळपासूनच बोरघाटात तीन किमीपर्यंत वाहनांतच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे अनेक प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला असून उन्हाच्या तडाख्याने प्रवासी अगदी हैराण झाले आहेत. दरम्यान, मुबंईहून पुण्याकडे जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -