घरमहाराष्ट्रकोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाईनगरीत भाविकांची गर्दी

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाईनगरीत भाविकांची गर्दी

Subscribe

श्री आई तुळजाभवानी देवीची नगरी कोजागिरी पौर्णिमेच्या दिनानिमित्त भाविकांनी फुलून गेली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून देवीच्या भक्तांनी मोठी गर्दी केल्याने तुळजाई नगरी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी महत्त्वाच देवस्थान असलेले श्री आई तुळजाभवानी देवीची नगरी कोजागिरी पौर्णिमेच्या दिनानिमित्त भाविकांनी फुलून गेली आहे. आज, मंगळवार कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आले आहेत. त्यामुळे दिवसभर श्री तुळजा भवानी मातेचा दरबार भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. आज पहाटे ४ वाजता श्री देवीच्या गाभाऱ्याचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. मंचकी निद्रेस असलेल्या श्री देवीला सकाळी ६ ते १० या वेळेत देवीची मंचकी निद्रा असलेल्या पलंगावरती सुंगधी तेलाचे अभिषेक घालण्यात आले. त्यानंतर देवीजीला वस्त्रोलंकार करुन धुपारती करण्यात आली. महाराष्ट्र राज्यसह कर्नाटक आध्रंप्रदेश, तेलंगणा आदींसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून देवीच्या भक्तांनी मोठी गर्दी केल्याने तुळजाई नगरी भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली होती.

पायी वारी करणाऱ्या भक्तांना मोफत अन्नदान

नळदुर्ग, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर हे मार्ग पायी वारी करणाऱ्या देवीच्या भक्तांनी व्यापून टाकले होते. देवीच्या दरबात येऊन कुलधर्म, कुलाचार, भोगी, अभिषेक, नैवेद्य, साडी-चोळी, पूजा करुन वर्षाकाठी कोजागिरी पौर्णिमेची नवसपूर्ती पायी वारी करुन वार्षिक खेटा करत अनेक भाविकांनी देवीच्या चरणी डोक टेकवून समर्पीत केला. तर आज मध्यरात्री २ वाजता तुळजाभवानी आईच्या मंचकी निद्रेस असलेली मुख्य चल मूर्ती सिंहासनावर आरुढ होणार असल्याने मंगळवारी तुळजाई नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. नळदुर्ग,सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या मार्गावरील भागात अन्नदात्यांनी पायी वारी करणाऱ्या देवीच्या भक्तांना मोफत अन्नदान करण्यात केले. पायी प्रवास करणाऱ्या मार्गातील भागात ठिकठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आली होती. घाटशीळ रोड परिसरातील कार पार्कींगमधील धर्मदर्शन, मुख दर्शन, अभिषेक दर्शन, रांगा याही भाविकांच्या उपस्थितीने गजबजून गेल्या होत्या.

- Advertisement -

कोजागिरीनिमित्त मार्गात बदल 

शहरातील बाजार पेठाही भाविकांच्या गर्दीने सजल्या होत्या. तुळजापूर एसटी महामंडळाच्या वतीने नळदूर्ग, हँलीपॅड येथून सोलापूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणाहून एसटीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच लातूर रोड येथून कर्नाटक राज्याच्याकडे जाणाऱ्या एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. सोलापूर रोड बंद असल्यामुळे शहराकडे जाणाऱ्या भक्तांची एसटी बसने इटकळ मार्गे सोय करण्यात आली होती. तर उस्मानाबाद रोडवरील भागात मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना, उस्मानाबाद आदींसह गावासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या आराधवाडी भागातून पायी वारी करणाऱ्या भक्तांना कळस दर्शनासाठी सोडण्यात येत होते. तर उद्या, बुधवारी दिवसभर पौर्णिमा असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -