राजापूरमध्ये विसर्जनाला गालबोट; पडवे येथे दोन मुले वाहून गेले

Rajapur
two children flown
प्रातिनिधिक छायाचित्र

राजापूर तालुक्यातील पडवे येथे गणेश विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. कुलदीप वारंग आणि भोसले असे दोन मुले वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मुले मुंबईतील राहणारी असून गणेशोत्सवानिमित्त ते टुकरूल वाडी या आपल्या गावी आले होते. दोघेही अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

राज्यभरात आज अनंत चतुर्दशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दहा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर साश्रू नयनांनी भाविक गणरायाला निरोप देण्यासाठी नदी, तलाव, खाडी आणि समुद्रकिनारी गर्दी करत आहेत. राजापूरच्या पडवे बंदर येथे देखील ही मुले विसर्जनासाठी आले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले.