पतीने केली पत्नीसह दोन मुलांची हत्या

माणगावसह रायगड जिल्हा हादरला

Mumbai
youth murder in latur due to facebook post

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीसह दोन चिमुरड्यांची निर्घृण हत्या केल्याची काळीज पिळवटवून टाकणारी घटना गुरुवारी सकाळी ९ वाजता तालुक्याच्या मोर्बा विभागातील दहिवली गावात घडली. या घटनेने तालुकाच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे.

संतोष शिंदे (36, रा. दहिवली) हा पत्नी सुहानी आणि पवन (4), संचित (2) या दोन मुलांसह राहत होता. पती-पत्नीत काही दिवसांपासून कौटुंबिक वाद होता. या वादातून अखेर संतोषने तिघांचे जीवन संपविले. या तिघांची त्याने दोरीने गळा आवळून हत्या केली. या घटनेनंतर संतोष थंड डोक्याने पोलीस पाटलांसमोर हजर झाला आणि आपण आपल्या कुटुंबाला ठार मारून टाकल्याची माहिती दिली. घरात होणार्‍या वादातून आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी संतोष शिंदे याला अटक केली आहे. अधिक चौकशी निरीक्षक अनिल टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पती-पत्नीच्या वादाची अखेर तिघांचा एकाचवेळी जीव जाण्यात झाल्याने गाव सुन्न झाला आहे. त्याहीपेक्षा ज्यांना जगाची ओळख नाही अशा दोन लहानग्यांनाही नराधाम बापाने संपविल्याने संतापाचे वातावरण पसरले आहे. क्रुरकर्मा संतोष शिंदे याला कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेऊन धसास लावण्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here