घरमहाराष्ट्ररोह्यातील कुंडलिका नदीत मुंबईचे तिघे बुडाले

रोह्यातील कुंडलिका नदीत मुंबईचे तिघे बुडाले

Subscribe

दोघांचे मृतदेह सापडले

रायगड जिल्ह्यातील रोहा येथे पिकनिकसाठी गेलेले मुंबईतील तिघे जण येथील कुंडलिका नदीत बुडाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी दाखल झालेल्या रायगड पोलिसांनी स्थानिक गावकरी आणि बचाव पथक यांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरु ठेवली. बुडालेल्यांमध्ये दोघे जण सख्खे भाऊ असून तिघेही मानखुर्द ट्रॉम्बे येथे राहणारे आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

महेश अरुण जेजुरकर ( ३९) ,परेश अरुण जेजुरकर (३५) आणि अक्षय शालिग्राम गणगे (२९) असे नदीत बुडालेल्यांची नावे आहेत.त्यापैकी परेश जेजुरकर आणि अक्षय गणगे यांचे मृतदेह सापडले आहेत. मुंबईतील ट्रॉम्बे येथे राहणारे हे तिघे रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राहणार्‍या संकेत पवार या मित्राला भेटण्यासाठी रविवारी सकाळी गेले होते. रोहा येथून संकेत पवार त्यांना घेऊन चिंचोली येथील बल्ले गावात असणार्‍या कुंडलिका नदी वर आले. दुपारी नदीवरच खाणेपिणे झाल्यानंतर महेश जेजुरकर, परेश जेजुरकर आणि अक्षय गणगे हे तिघे नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले होते. मात्र नदीच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे हे तिघे नदीत बुडत असताना तिघांनी मदतीसाठी हाक मारत होते, मात्र काही कळण्याच्या आत तिघेही नदीच्या प्रवाहासोबत वाहत गेले.

- Advertisement -

संकेत पवार याने ताबडतोब स्थानिक गावकर्‍यांना मदतीसाठी बोलावून आणले. मात्र नदीच्या पाण्याचा प्रवाहामुळे गावकर्‍याना देखील त्यांना वाचवणे शक्य झाले नाही.अखेर कोलाड पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी सोबत आणलेल्या बचाव पथकाने या तिघांचा शोध सुरु केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -