Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अहमदनगर : लष्कराच्या सरावात बॉम्ब फुटून दोन जण ठार

अहमदनगर : लष्कराच्या सरावात बॉम्ब फुटून दोन जण ठार

अहमदनगर येथे लष्कराच्या सरावाचा बॉम्ब फुटल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Story

- Advertisement -

अहमदनगर जवळील केके रेंज येथील लष्कराच्या सरावाचा बॉम्ब फुटल्यामुळे दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. अक्षय नवनाथ गायकवाड (१९) आणि संदीप भाऊ साहेब तिरवडे (३२) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन जणांची नावे आहेत.

नेमके काय घडले?

अहमदनगरच्या खारे कर्जुने गावाजवळ लष्कराचे के. के. रेंज आहे. याठिकाणी लष्करी सराव सुरु होता. लष्करी सराव झाल्यानंतर अक्षय गायकवाड आणि संदीप तिरवडे हे दोघेही के. के. रेंजमध्ये बॉम्बचे भंगार शोधण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी बॉम्ब निकामी झाल्याचे समजून त्यांनी तो बॉम्ब ताब्यात घेतला. हा बॉम्ब फोडून त्यातील धातू काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा धातू काढण्याच्या प्रयत्नात असताना तो बॉम्ब अचानक हातात फुटला आणि त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – लष्कराच्या ताफ्यात येणार ४६४ रणगाडे; ‘भीष्म’चाही समावेश


 

- Advertisement -