घरमहाराष्ट्रड्रेनेजमध्ये पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; एक शेतकरी बेपत्ता

ड्रेनेजमध्ये पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; एक शेतकरी बेपत्ता

Subscribe

औरंगाबादच्या भूमिगत गटार योजनेच्या ड्रेनज चेंबरमध्ये मोटार दुरुस्तीसाठी उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गुदमरल्याने मृत्यू झाला असून एक शेतकरी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भूमिगत गटार योजनेच्या ड्रेनज चेंबरमध्ये मोटार दुरुस्तीसाठी उतरलेल्या दोन शेतकऱ्यांचा गुदमरल्याने मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या चार शेतकऱ्यांची प्रकृत्ती देखील गंभीर असून यांच्यामधील एक शेतकरी बेपत्ता झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास चिकलठाणा भागातील उत्तरानगरीच्या मागे असलेल्या गावठाण भागातील सुखना नदीच्या पात्रात घडल्याचे समोर आले आहे. रामेश्वर डांबे असे बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांचा शोध सुरु आहे.

नेमके काय घडले?

उत्तरानगरीच्या मागील बाजूला असलेल्या सुखना नदीच्या पात्रालगत शेतजमिनी आहेत. सुखना नदीच्या पात्रात भूमिगत गटार योजनांमधील पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या ड्रेनेज लाइनवर सिमेंटची चेंबर उभारण्यात आले आहेत. येथील काही शेतकऱ्यांनी हे सांडपाणी शेतीला वापरण्यासाठी येथील चेंबरवर विद्युत मोटारी बसवल्या असून, मेनहोलमध्ये पाइप सोडलेले आहेत. हे पंप नादुरुस्त झाल्यास, कचरा अडकल्यास येथील शेतकरी बटाईदार नेहमीच या मेलहोलमध्ये उतरतात. त्याप्रमाणे सोमवारी दोन शेतकरी ड्रेनज चेंबरमध्ये मोटार दुरुस्तीसाठी उतरले होते. यावेळी त्यांना श्वसनाचा त्रास झाला आणि ते बेशुद्ध झाले आणि यामध्ये दिनेश दराखे आणि जनार्दन साबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा प्रकार समजताच त्यांना वाचविण्यासाठी तेथील रामकिसन रंगनाथ माने, उमेश जग्गनाथ कावडे, प्रकाश केरुबा वाघमारे, रामेश्वर पेरुबा डांबे आणि नवनाथ रंगनाथ कावडे हे मदतीसाठी मेनहोलमध्ये उतरले. मात्र त्यावेळी त्यांना देखील श्वसनाचा त्रास झाला आणि ते देखील बेशुद्ध झाले. तर रामेश्वर डांबे ड्रेनेजच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

वाचा – ‘शेतकरी मागत आहेत चारा व छावण्या आणि सरकार देतेय डान्सबार आणि लावण्या’

वाचा – बुलेट ट्रेनच्या धसक्याने शेतकरी जीवानिशी…!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -