Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर महाराष्ट्र खोपोली बाह्यमार्गावर ट्रक अपघातात २ ठार

खोपोली बाह्यमार्गावर ट्रक अपघातात २ ठार

Mumbai

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक समोर उभ्या असलेल्या १८ चाकी ट्रकवर मागून आदळून घडलेल्या अपघातात दोनजण ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी सकाळी 10.30 वाजता खोपोली बाह्य मार्गावर ही दुर्घटना घडली.
अपघातग्रस्त ट्रक माल घेऊन पुणे येथून मुंबईच्या दिशेने निघाला होता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग सोडून बाह्य मार्गावर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक गतिरोधकावर आदळून समोर उभ्या असलेल्या कॉईलच्या ट्रकवर आदळला. यात आदळलेल्या ट्रकचा क्लिनर सुुुनील नामदेव शेलार आणि ट्रकमधून प्रवास करीत असलेला रुण पंडित मोहिते (४०, सांगली) हे दोघे जागीच ठार झाले, तर चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी निगडी (पुणे) येथील लोकमान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातानंतर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.दरम्यान, खालापूर तालुक्यात अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या 4 दिवासांत 3 अपघातांत 7 बळी आणि 58 जण जखमी झाले आहेत.