घरमहाराष्ट्रमौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी चोरल्या दुचाकी

मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी चोरल्या दुचाकी

Subscribe

१ लाख ७८ हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत

मौजमजा करण्यासाठी दुचाकी वाहने चोरणा-या दोन अल्पवयीन चोरट्यांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १ लाख ७८ हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात भसरी पोलिसांना यश आले आहे. या घटने प्रकरणी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील दोन आणि दौंड पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

असा घडला प्रकार 

भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ मैदानात दोन चोरटे येणार आहेत अशी भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोन्ही चोरट्यांना पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरी केल्याचे सांगितले.

- Advertisement -

१ लाख ७८ हजार किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत

तसेच पिंपरी-चिंचवड, पुणे आणि दौंड येथून एकूण पाच दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी १ लाख ७८ हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, आशिष गोपी, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, सागर जाधव, संदीप जोशी, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.


शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या पती विरोधात पोलिसांत तक्रार दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -