घरमहाराष्ट्रपंढरपुरात दोन अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार

पंढरपुरात दोन अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार

Subscribe

इयत्ता नववीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीवर तिच्या शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तर दुसर्‍या एका घटनेत शेजर्‍याने एका विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची ही घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून पंढरपूर हादरून गेले आहे.

सुपली येथील एका शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीला नंदकुमार कोळवले या शिक्षकाने भेटायला बोलावले आणि तिला जीपमध्ये बसवून अकलूज येथे नेले. त्यानंतर त्याने अकलूज येथे तिच्यावर पाशवी अत्याचार केले. या मुलीने तिच्या घरच्यांना हा प्रकार सांगितला. मात्र समाजात अब्रू जाऊ नये म्हणून तिच्या घरच्यांनी या प्रकाराची वाच्यता केली नाही. या घटनेनंतर या शिक्षकाने सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे बदली करून घेतली. मात्र त्यानंतरही त्याने या मुलीला धमकावणे सुरूच ठेवले. त्यातच या मुलीवर केलेल्या अत्याचाराचे फोटो व्हायरल झाले आणि नराधम कोळवलेचा खरा चेहरा लोकांसमोर आला. निर्भया पथकाने या कुटुंबाचे समुपदेशन केल्यावर अखेर या कुटुंबाने शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून शाळेने मात्र अजूनही या शिक्षकावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

- Advertisement -

ही घटना ताजी असतानाच गार्डी येथील शाळेत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर शेजार्‍याने अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. राहुल फाटे या व्यक्तीने शेजारी राहणार्‍या या विद्यार्थीनीला शेतात बोलावून तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी या नराधमावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. दरम्यान, दोन्ही घटनांप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांत पोस्कोसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणातील दोन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -