लांजा येथे भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू

मुंबई - गोवा महामार्गावर लांजा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Lanja
accident
प्रातिनिधीक फोटो

मुंबई – गोवा महामार्गावर लांजा येथे शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची घटना घडली. मुंबई – गोवा महामार्गावर लक्झरी आणि बसची जोरदार धडक झाली असून या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात लांजातील रखांगी या ठिकाणी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

नेमके काय घडले?

मुंबई – गोवा महामार्गावर शुक्रवारी मध्य रात्री १ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. लांजातील रखांगी प्लाझासमोर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रखांगी प्लाझासमोर दुधाच्या गाडीतून दूध उतरुन तेच दूध दुसऱ्या गाडीत भरण्याचे काम सुरु होते. या दोन्ही गाड्या एकमेकांकडे पाठ करुन उभ्या होत्या. त्यावेळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बसने दुधाच्या गाडीला जोरदार धकड दिली आणि हा अपघात घडला. या अपघातात मुबारक आब्बास सारंग (३५) यांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघाता एक कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. या जखमीला जवळील रुग्णालयात दाखव करण्यात आले. मात्र या कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.


वाचा – अंत्यविधीवरुन परतताना भीषण अपघात; ६ महिलांचा मृत्यू


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here