घरमहाराष्ट्रजळगाव जिल्हा कारागृहातून दोन कैदी पळाले

जळगाव जिल्हा कारागृहातून दोन कैदी पळाले

Subscribe

जळगावच्या जिल्हा कारागृहातून बुधवारी दोन कैदी पळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्वयंपाक घराच्या भिंतीवरुन उडी मारली.

जळगावच्या जिल्हा कारागृहातून बुधवारी दोन कैदी पळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील बिलवाडी गावाचा शेषराव सुभाष सोनवणे आणि बोदवड गावाचा रविंद्र भिमा मोरे हे दोन कैदी आज सकाळी जळगावच्या जिल्हा कारागृहातून पळून गेले. पोलीस या चोरांचा शोध घेत आहे. या कैद्यांनी चोरी केली होती. त्यामुळे चोरीच्या आरोपाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना न्यायालयीन कोढडी सुनावण्यात आली होती. त्यानुसार हे आरोपी ४ सप्टेंबर २०१८ रोजी कारागृहात दाखल करण्यात आले होते.

असे पळाले कैदी

या कैद्यांवर स्वयंपाक बनवण्याच्या कामाची जबाबदारी होती. सकाळी साडे पाचच्या सुमारात या कैद्यांना बाहेर काढण्यात आले होते. त्यांनी थोडावेळ काम केले आणि त्यानंतर स्वयंपाक घराच्या भिंतीवरुन उडी मारुन पळ काढला.

- Advertisement -

तुरुंगातून कैदी पळाल्याच्या घटना पुन्हा-पुन्हा

जळगावच्या जिल्हा कारागृहातून दोन कैदी पळाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या कामांवर पुन्हा प्रश्न उभे राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून कैदी पळाल्याची घटना घडली होती. कैदी पळाल्याच्या अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. कडक पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही हे कैदी पळून कसे जातात, असे प्रश्न पुन्हा-पुन्हा विचारले जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -