घरमहाराष्ट्रराज्यात दोन हजार करोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात दोन हजार करोनाबाधितांचा मृत्यू

Subscribe

२४ तासात ८३८१ रुग्ण बरे

राज्यात २६८२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून करोनाबाधित रुग्णांची संख्या ६२,२२८ झाली आहे. तसेच ११६ जणांचा मृत्यू झाला असून करोनाबाधित मृतांची संख्या २०९८ झाली आहे. आज ८,३८१ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याने राज्यात आजपर्यंत २६९९७ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११ दिवस होता तो आता १५.७ दिवस झाला आहे.

राज्यात ११६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी झाली आहे. मृतांमध्ये मुंबई -३८, नवी मुंबई -९, भिवंडी -३, रायगड – २, मीरा भाईंदर -३, पनवेल १, ठाणे – १, कल्याण डोंबवली -१, जळगाव -१७, नाशिक -३, मालेगाव -५, धुळे -७, पुणे -१३, सोलापूर -३, कोल्हापूर -३, औरंगाबाद ५, अकोला २

- Advertisement -

मृतांमध्ये ७७ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११६ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८ रुग्ण आहेत तर ५५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहेत. या ११६ रुग्णांपैकी ७५ जणांमध्ये ( ६५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १६ मे ते २६ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७० मृत्यूंपैकी मुंबई १६, जळगाव- १४, नवी मुंबई -९, धुळे -६, मालेगाव -५ , औरंगाबाद ३, भिवंडी-३, नाशिक -३ , अमरावती -२ , कोल्हापूर -२, मीरा भाईंदर -२, रायगड -२, सोलापूर -२ आणि १ मृत्यू ठाणे येथील आहे.

- Advertisement -

मुंबईत करोनाचे १४३७ नवे रुग्ण, शुक्रवारी ३८ करोनाबाधितांचा मृत्यू
मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील दोन दिवसांपासून पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे, आठवड्याच्या सुरुवातीला रुग्ण संख्येत घसरण झाल्याचे समोर आले होते. या वाढत्या रुग्ण संख्यावर नियंत्रण कसे मिळवायचा हा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा राहिला आहे.

शुक्रवारी करोनाने ३८ जणाचा बळी घेतला आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये १४३७ नवे रुग्ण सापडल्याने करोनाबाधितांची संख्या ३६ हजार ७१० वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ३८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११७३ वर पोहचला आहे. मृत्यू झालेल्या ३८ जणांमधील २८ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २२ पुरुष तर १६ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील दोन जणाचे वय ४० वर्षांखाली आहे. २० जण हे ६० वर्षांवरील, तर १६ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईत करोनाचे ८३२ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित करोना रुग्णांची संख्या २९ हजार ३८६ वर पोहचली आहे. तसेच ७१५ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १६, ००८ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -