घरमहाराष्ट्रवर्षभरात ‘एमबीबीएस’च्या २ हजार जागा वाढणार

वर्षभरात ‘एमबीबीएस’च्या २ हजार जागा वाढणार

Subscribe

येत्या वर्षभरात ‘एमबीबीएस’च्या तब्बल दोन हजार जागा वाढतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज विधान परिषदेत व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात रुग्णसंख्येच्या तुलनेत भासणारी डॉक्टरांची कमतरता दूर होणार आहे. 

वैद्यकीय पदव्युत्तरपदवी आणि आता पदवी प्रवेशाचा प्रश्न चिघळल्यानंतर अखेर राज्य सरकारने राज्यात एमबीबीएसच्या जागा वाढविण्याची मान्यता केंद्राकडून मिळवण्यात यश मिळवले आहेत्यामुळे आता राज्यात रुग्णसंख्येच्या तुलनेत भासणारी डॉक्टरांची कमतरता दूर होणार आहेराज्यात वैद्यकीय अभ्याक्रमाच्या जागा वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या वर्षभरात ‘एमबीबीएस’च्या तब्बल दोन हजार जागा वाढतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज विधान परिषदेत व्यक्त केला आहे. तसेच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागाही वाढवून घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सरकार अपयशी ठरले

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मराठा आरक्षण लागू करण्यात आले. त्यामुळे यंदा मराठा आरक्षणाची अमंलबजावणी करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. परिणामी, विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यांनी सातत्याने आंदोलने केली. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले यांनी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत केला. यावर गिरीश महाजन यांनी उत्तर दिले.

- Advertisement -

काय म्हणाले गिरीष

आरक्षण लागू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे हे पहिलेच वर्ष होते. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी आल्या असून यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप देखील झाला आहे. मात्र, पदव्युत्तर प्रवेशासाठी विद्यार्थी तसेच पालकांना विश्वासात घेऊन पार्दर्शी आणि प्रामाणिक भूमिकेतून प्रयत्न करण्यात आल्याचे महाजन यांनी टकले यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.


हेही वाचा – राज्यात ‘एमबीबीएस’च्या ३६७० जागा वाढणार

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -