घरमहाराष्ट्रपुणे : पवना धरणात दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू

पुणे : पवना धरणात दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू

Subscribe

पवना धरणात दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

पुणे येथील पवनाधरण परिसरात आलेल्या पर्यटकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमय दिलीप राहते (२५) आणि तेजस रवि पागल (२२) या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई येथील काळाचौकी येथे राहणारी ही मुले पवना धरणावर फिरण्यासाठी आली होती.

नेमके काय घडले?

पवना धरणात फिरण्यासाठी हे तरुण गेले होते. रविवार, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोहण्याचा आनंद घेण्यासाठी हे तरुण पाण्यात उतरले. मात्र, धरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर देखील त्याठिकाणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दोन पर्यटकांनी आणि गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वाचवण्यात यश आले नाही. अखेर गावकऱ्यांनी दोघांना बाहेर काढून सोमाटणे येथील एका खाजगी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नागरिकत्व सुधारणा कायदा सावरकरांच्या तत्वांविरोधात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -