घरमहाराष्ट्रकोथरूड: इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

कोथरूड: इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

Subscribe

इमारतीच्या डक्टमध्ये तोल जाऊन पडल्याने दोघांचा मृत्यू

इमारतीच्या उदवाहणाचे (लिफ्ट) चे काम सुरू असताना डक्टमध्ये पडून दोन कामरागारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुणे शहरात घडली आहे. मुशीर बुराह रहेमान वय-२४ अस मयत कामगाराचे नाव असून दुसऱ्या कामगाराचे नाव समजू शकलेले नाही. घटनास्थळी अग्निशमन आणि पोलीस दाखल झाले आहेत. दोघे मूळ बंगाल येथील राहणार असल्याचे पोलिसांनी माहिती दिली.

अशी घडली घटना

पुण्याच्या कोथरूडमध्ये २० मजली इमारतीचे काम सुरू असताना दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दोन कामगारांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यू झालेले दोघे कामगार आज दुपारी महात्मा सोसायटी २० व्या मजली इमारतीच्या उदवाहन (लिफ्ट) चे बाराच्या सुमारास काम सुरू करत होते मात्र इमारतीच्या लिफ्ट डक्टमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या घटनेची तपास करत असताना असे समोर आले की, २० मजले इमारतीच्या लिफ्टचे काम करत असताना इमारतीच्या डक्टमध्ये तोल जाऊन दोघे पडले होते. यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यांना खासगी रुग्णालयात तातडीने नेण्यात आले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, कामगारांनी सुरक्षे विषयीची साधने वापरली की नाही याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -