घरताज्या घडामोडीआमदारासह दोन वर्षीय बालिका पॉझिटिव्ह; दिवसभरात २३ नवे बाधित

आमदारासह दोन वर्षीय बालिका पॉझिटिव्ह; दिवसभरात २३ नवे बाधित

Subscribe

जिल्हा अकराशेच्या उंबरठ्यावर; शहरासह ग्रामीण भागात झपाट्याने फैलाव

नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत असून गुरुवारी (दि.२८) नवीन २३ रुग्णांची यात भर पडली आहे. विशेष म्हणजे, नाशिकमधील एका आमदारास देखील करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यापूर्वी भाचा, भाची व भावजय करोना पॉझिटिव्ह आढळले. शहरात २ वर्षीय बालिकेचाही यात समावेश असून नाशिक जिल्ह्यात एकूण १०८१ रुग्ण करोनाबाधित असून एकट्या नाशिक शहरात १५१ रुग्ण बाधित आहेत.

नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला आहे. शहरात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी शहरात मखमलाबाद रोडवरील ओम गुरुदेव नगर,पंचवटी येथील ५७ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला आहे. ते बुधवारी (दि.२७) ताप, सर्दी, खोकला सुरु झाल्याने खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना उपचारार्थ डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १० हजार ८८६ संशयित रुग्णांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये १ हजार ८१ रुग्ण पॉझिटिव्ह व ९ हजार ३५९ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. १०८१ पैकी ७८६ रुग्ण बरे झाले असून २२१ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण ४५, नाशिक शहर ८५, मालेगाव शहर ८७, जिल्ह्याबाहेरील ४ आहेत. अद्याप ४६० अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ३२, नाशिक शहर १५५, मालेगाव शहर २७३ आहेत. गुरुवारी सकाळी आढळून आलेले ओमनगर, पंचवटी येथील ५१ वर्षीय पुरुष, जानोरी (दिंडोरी) येथीअ ५३ वर्षीय पुरुष आणि चोपडा (जळगाव) येथील ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. प्रशासनास सायंकाळी ७.३० वाजता ५५ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १४ रुग्ण बाधित आहेत. यामध्ये १३ पॉझिटिव्ह नाशिक शहरातील आहेत.

- Advertisement -

२१० रुग्ण दाखल

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २१० रुग्ण उपचारार्थ विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले. यामध्ये जिल्हा रुग्णालय ६, नाशिक महापालिका रुग्णालये ९८, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ३, मालेगाव महापालिका रुग्णालये २०, नाशिक ग्रामीण रुग्णालयात ८२ रुग्ण दाखल झाले आहेत.

शहरातील बाधित रुग्ण

कामटवाडे, नाशिक (५), पखालरोड, व्दारका (१), जुने नाशिक (२), श्रीरामनगर, जत्रा हॉटेल, आडगाव (१), मुमताजनगर, वडाळा (१), दत्तमंदिर, नाशिकरोड (२), शांतीनगर, मखमलाबाद रोड (१), ओझर (१)

- Advertisement -

मालेगावात ८१ टक्के रुग्ण करोनामुक्त

मालेगावातील ७२१ बाधित रुग्ण आढळून आले असले तरी आरोग्य विभागाने त्यांच्यावर वेळेत उपचार केल्याने ७२१ रुग्णांपैकी ५८७ रुग्ण (८१ टक्के) बरे झाले आहेत. नाशिक शहरात १३९ पैकी ४६, नाशिक ग्रामीण १५८ पैकी ११० व जिल्ह्याबाहेरील ४९ पैकी ४३ रुग्ण बरे झाले आहेत.

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण —10८१
नाशिक शहर —-1५१ (मृत ८)
नाशिक ग्रामीण —१५९ (३)
मालेगाव —— ७२१ (मृत ४७)
अन्य ——–४९ (मृत २)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -