घरमहाराष्ट्रउबेर चालकाकडून महिलेचा विनयभंग

उबेर चालकाकडून महिलेचा विनयभंग

Subscribe

एका संगणक अभियंता महिलेचा उबेर चालकांने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी उबेर चालक तुषार लांडगे या आरोपीस अटक करण्यात आली आहे.

स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे समोर आले आहे. एका उबेरच्या चालकाने संगणक अभियंता महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पिंपरी – चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी उबेर चालकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली असून तुषार बबनराव लांडगे असं या चालकाचे नाव आहे. उबेर चालकाने आरश्यात पाहून अश्लील हावभाव करत. त्या महिलेला गाडीमध्ये लॉक करुन खाली देखील उतरू दिले नसल्याचे महिलेने सांगितले आहे. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलिसात चालका विरोधात तक्रार दाखल केली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय महिला ही बाणेर येथे वास्तव्यास असून त्या हिंजवडी मधील नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यकरत आहेत. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चालक तुषार लांडगे हा त्यांना घेण्यासाठी गेला. महिला कॅबमध्ये बसल्यानंतर त्यांनी आपल्या जेवणाचा डब्बा उघडला आणि त्या खात बसल्या. तेव्हा कॅब चालकांने त्या महिलेला गाडीत डब्बा खाण्यास विरोध केला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक भांडण झाले. त्यानंतर मात्र तुषार याने आरशातून वाईट नजरेने महिलेकडे बघितले. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. हिंजवडी वाकड पुलाखाली गाडी आल्यानंतर कॅब चालक लांडगे याने त्या महिलेला गाडीच्या खाली उतरू दिले नाही. तसेच महिलेला आत लॉक करून ठेवले. ‘आत तुझे काय हाल करतो’ अशी धमकी देखील दिली. हा प्रकार काही मिनिटे चालला त्यानंतर संबंधित महिलेने हिंजवडी पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली असून त्याला जेरबंद करण्यात आले आहे.

- Advertisement -

उबेर चालकाच्या या अनुभवानंतर आम्ही त्याला कमावरुन काढून टाकले आहे. तसेच प्रवाशांची सुरक्षा ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे कायद्याच्या अंमलबजावणी, अधिकाऱ्यांना तपासणी आणि कार्यवाहीस शक्य तितकी मदत करणार आहोत.   – प्रकाश शर्मा, उबेर प्रवक्ता


वाचा – कॅनडीयन महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक

- Advertisement -

वाचा – ट्रेनमध्ये बारा वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -