घरमहाराष्ट्रतर रामराजेंची जीभ हासडली असती, उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर संताप

तर रामराजेंची जीभ हासडली असती, उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर संताप

Subscribe

शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही यांच्यातील वाद मिटला नसल्याचे दिसून आले.

मागच्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे नीरा देवघर धरणाचे बारामतीला जाणारे पाणी बंद केल्यामुळे रामराजेंवर अप्रत्यक्ष टीका करत होते. तसेच त्यांनी माढाचे खासदार आणि भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर चांगलेच संतापले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबई येथील बैठकीत केला. मात्र पवारांचे हे प्रयत्न विफल ठरले आहेत.

रामराजे नाईक निंबाळकर यांनी बैठकीत उदयनराजेंना चक्रम आणि पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिल्यामुळे उदयनराजे चांगलेच भडकले. त्यानंतर ही बैठक अर्ध्यावरच सोडून ते तावातावाने बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली खदखद व्यक्त केली. रामराजेंसारख्या ज्येष्ठ व्यक्तीच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. जर ते माझ्या वयाचे असते तर त्यांची जीभ हासडून टाकली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली.

- Advertisement -

नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे पाणी बंद केल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुरु झाला आहे. सातारा, सोलापूरच्या हक्काचे पाणी बारामतीला गेल्याबद्दल उदयनराजे यांनी रामराजेंना जबाबदार धरले होते. त्यासाठी दोन दिवस सातारा, सोलापूरचा दौरा करत त्यांनी रामराजेंवर टीका देखील केली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -