घरमहाराष्ट्रआत्मपरिक्षण केलं असतं तर आत्मक्लेश करण्याची वेळ आली नसती - उदयनराजे

आत्मपरिक्षण केलं असतं तर आत्मक्लेश करण्याची वेळ आली नसती – उदयनराजे

Subscribe

“आज काही पक्षांनी आत्मचिंतन केले पाहीजे. त्यांनी आत्मपरिक्षण केले असते तर आत्मक्लेश करण्याची वेळ आली नसती. एकदा-दोनदा लोक समजून घेत असतात पण अनेक वर्षांपासून ‘आडवा आणि त्याची जिरवा’ ही एकच योजना काही पक्षांनी सुरु ठेवली. आता या योजनेला कंटाळून उमेदवार पक्ष सोडत आहेत. तर सामान्य लोकही या योजनेला कंटाळले आहेत.”, अशी टीका माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता महाजनादेश यात्रेत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरु असून ही यात्रा आज सातारा येथे आली होती. यावेळी सभेत बोलत असताना उदयनराजे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कॉलर उडवून पुन्हा एकदा जनतेसमोर कमिटमेंट केली आहे.

उदयनराजे पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मभावची संकल्पना मांडली. महाराजांना अपेक्षित असलेले स्वराज्य मोदी सरकारच्यारुपाने प्राप्त झाले आहे. सीमेवर आज हजारो सैनिक शहिद झाले. आज भाजपने जे पाऊल उचलेले ते काँग्रेसने आधीच उचलले असते तर इतके सैनिक शहीद झाले नसते. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले पाऊल भाजपने उचलले. भाजपचे एकेकाळी दोनच खासदार होते. आज परिस्थिती उलटली आहे. त्यामागची कारणीमीमांसा आपण समजून घेतली पाहीजे. लोकांना आपण एकदा -दोनदा फसवू शकतो. पण नेहमीच फसवता येत नाही.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -