घरमहाराष्ट्र'माझ्या नावाचा वापर करून मतदारांची दिशाभूल केली जातेय'

‘माझ्या नावाचा वापर करून मतदारांची दिशाभूल केली जातेय’

Subscribe

बीड लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा वापर करत प्रीतम मुंडे यांना पाठींबा देणारे बॅनर लावले आहे. यावर उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात माझ्या नावाचा वापर करून मतदारांची दिशाभूल केली जात असून या प्रकाराला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन करणारे प्रसिध्दीपत्रक साताऱ्याचे खासदार आणि उमेदवार उदयनराजे भोसले यांनी काढले आहे. बीड लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा वापर करत प्रीतम मुंडे यांना पाठींबा देणारे बॅनर लावले आहे. यावर उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

प्रसिद्धीपत्रक

सैन्यांच्या शौर्यावर मतं मागताहेत

उदयनराजे भोसले यांनी एक प्रसिध्दीपत्रक काढून याच्याशी काही संबंध नाही. मी स्वतः सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचा उमेदवार आहे. त्यामुळे माझ्या नावाचा वापर करून मतदारांची दिशाभूल केली जात आहे. लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात असून प्रचाराच्या माध्यमातून विविध राजकीय पक्ष, उमेदवारांनी आपली भूमिका मांडली आहे. या निवडणूकीचे महत्त्व व देशासमोरील प्रश्न पाहता शेती-शेतकरी, बेरोजगार तरुण, छोटे व्यावसायिक, उद्योजक, महिला, दलित, वंचित वर्गासाठी भाजप सेना सरकारने देशाची व राज्यात सत्ता असतानाही कार्यक्रम राबवले नाहीत. त्यासंदर्भात आपण काय केले हे सांगण्यासारखे नसल्याने सैन्य दलाच्या शौर्याचा मुद्दा पुढे करून मते मागणे सुरु आहे, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -