घरताज्या घडामोडीसातारा: राऊत आणि आव्हाडांच्या नावाची पाटी गाढवाला लावून काढली धिंड

सातारा: राऊत आणि आव्हाडांच्या नावाची पाटी गाढवाला लावून काढली धिंड

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे नेते आणि साताऱ्यातील रहिवाशी आक्रमक झाले आहेत. राऊतांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी सातारा बंद हाक दिली आहे. तसंच त्यांनी साताऱ्यात संजय राऊत यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. पोवई नाका चौकात शिवसनेचे खासदार संजय राऊत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी गाढवाला लावून त्यांची धिंड काढली आहे.

साताऱ्यात खासदार संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी गाढवाला लावून धिंड काढली.

उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून सातारा येथे शिवसनेचे खासदार संजय राऊत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी गाढवाला लावून त्यांची धिंड काढली. Chhatrapati Udayanraje Bhon Sanjay Raut Jitendra Awhad #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಜನವರಿ 15, 2020

- Advertisement -

शहरात अनुचित प्रकार घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय आमदार राम कदम देखील पोलिसात तक्रार केली आहे. तसंच आमदार प्रसाद लाड यांनी देखील राऊतांविरोधात सायन पोलिस स्टेशन बाहेर उपोषण करणार आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर बोलताना भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. यादरम्यान त्यांनी ‘शिवसेना नावं दिलं तेव्हा वंशजांना विचार होत का? असा सवाल यावेळी केला होता. याचाचं उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ‘शिवसेना नावं दिलं तेव्हा वंशजांना विचार होत का? असा प्रश्न करत आहे. मात्र त्यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत. या विश्वाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जेव्हा आम्ही गणपतीची पूजा करतो तेव्हा आम्ही गणपतीला तुझी पुजा करू का म्हणून विचारायला जात नाही.’

- Advertisement -

हेही वाचा – ‘मी पुन्हा येईन’ आमिर खानचे बारामतीमध्ये वक्तव्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -