घरमहाराष्ट्रकोण कुणाला आडवं करतंय बघू - उदयनराजे

कोण कुणाला आडवं करतंय बघू – उदयनराजे

Subscribe

उदयनराजे हे नेहेमीच आपल्या वक्तव्यातील खास शैलीसाठी ओळखले जातात. राष्ट्रवादीतील उमेदवारीला विरोध झाल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याच खास शैलीने विरोधकांना उत्तर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्येक जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. मात्र रविवारी झालेल्या सातारा जिल्ह्यातील बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देऊ नये असा सुर पहायला मिळाला. मात्र आता उदयनराजे यांनी यावर भाष्य केले असून, त्या बैठकीत मला उमेदवारी देऊ नका असे सांगितले. एवढेच नाही तर अगदी मला आडवे करायचे सध्या चालले आहे. मात्र कोण कुणाला आडव करत हे बघुयाच असा आपल्या खास शैलीत त्यांनी इशारा दिला. आज मुंबईत मंत्रालायात मुख्यमंत्र्यांची आणि भाजपा मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या नावाला विरोध करणाऱ्या नेत्यांना इशारा दिला.

तर त्याचा मी प्रचार करीन

आज मला काहीजण विरोध करत आहेत. मात्र मी खासदारकीपेक्षा लोकांच्या पाठिंब्याला महत्व देतो. तसेच जर कुणाला वाटत असेल की मी उदयनराजे पेक्षा जास्त मतांनी निवडून येईन त्याने आकडे दाखवावे मी त्याच्या प्रचाराचे काम करेन असे देखील ते यावेळी म्हणालेत. तसेच लोकशाहीमध्ये इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय पुढे जाता येत नाही, त्यामुळे अनेकांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते मात्र त्याला माझा विरोध नाही असे देखील पत्रकार परिषदेत राजे म्हणालेत.

- Advertisement -

म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटलो

दरम्यान उदयनराजे मुख्यमंत्र्यांना भेटणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर राजकीय वर्तुळात उदयन राजे नेमकं आजच्या भेटीत मुख्यमंत्र्यांशी काय बोलणार याची उत्सुकता सगळ्याना लागली होती. मी कामानिमित्त मंत्रालयात येत असतो. तसेच जेव्हा येतो तेव्हा मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याच्या भेटी घेत असतो. आजही काही कामाची उद्घाटने आणि भूमिपूजनाबाबत चर्चा झाली, तसेच मतदारसंघातील कामाबाबत चर्चा झाली असे त्यांनी सांगितले. याचसोबत आजच्या बैठकीत माझी त्यांच्यासोबत राजकीय चर्चा झाल्याचे सांगीतले मात्र नेमकी काय चर्चा झाली हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं. तसेच आता माझी खासदारकी लढवण्याची इच्छा भागली असून, खासदारकी लढवली पाहिजेच असे नाही, लोकांना वाटले तरच खासदारकी लढेन असे ते यावेळी म्हणालेत. तसेच जनता हाच माझा पक्ष असल्याचे सांगत मला पक्षात या म्हणून सांगणारे माझे सगळेच मित्र असल्याचे सांगत नेमकं राष्ट्रवादीला सोडून दुसऱ्या पक्षात जाणार की नाही हे मात्र बोलणं त्यांनी टाळलं. त्यामुळे उदयन राजेंच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली. राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेले उदयन राजे खरच राष्ट्रवादी सोडणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -