साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालणार; समर्थकांची फाईट

Satara
Udayan Raje Bhosle Ekach fight vatavaran tight
उदयनराजेंच्या समर्थकांनी फाईट चित्रपटातील कलाकारांची गाडी फोडली

सातारा आणि उदयनराजे भोसले हे समीकरण सर्वांनाच परिचित आहे. उदयनराजे असताना साताऱ्यात दुसऱ्या कुणाची कशी चालणार? असा समज उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांचा आहे. रीअल लाईफ असो किंवा रिल लाईफ साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालणार… असं म्हणत उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी ‘फाईट’ नावाच्या सिनेमाची पत्रकार परिषद उधळून लावली. या सिनेमात ‘साताऱ्यात फक्त मीच चालणार’ या डायलॉगला उदयनराजेंच्या समर्थकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे साताऱ्यातील राधिका पॅलेस इथे सिनेमाची पत्रकार परिषद सुरु असताना समर्थकांनी प्रमोशनसाठी आलेल्या गाडी आणि पोश्टरची तोडफोड केली.

‘भाई’ चा दुसरा टीझर लाँच!

या प्रकरणी आता शाहूपुरी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आज सकाळीच फाईट सिनेमातील आक्षेपार्ह वाक्य पाहताना उदयनराजे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. फाईट या सिनेमातील हे वाक्य ऐकताच उदयनराजे मिश्किलपणे डोक्यावर हात मारून घेताना, त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

वाचा – तर मलाच नक्षलवाद्यांचे नेतृत्व करावे लागेल – उदयनराजे भोसले

उदयनराजेंच्या समर्थकांनी एकच फाईट देऊन वातावरण टाईट केल्यानंतर सिनेमाच्या कलाकारांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही साताऱ्यातीलच कलाकार आहोत. एखादे वाक्य किंवा सिनबाबत जर आक्षेप होता, तर कार्यकर्त्यांनी एकदा आमच्याशी चर्चा करायला हवी होती. आम्ही संबंधित भाग चित्रपटातून काढून टाकला असता. मात्र एवढ्याश्या गोष्टीवरुन गाडीची तोडफोड करणे चुकीचे असल्याचे कलाकारांनी सांगितले. मात्र कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असून साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालणार या पवित्र्यावर ठाम आहेत.

काय म्हणतात उदयनराजे या जन्मात केलेली पापं इथंच फेडावी लागतात 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here