साताऱ्यात उदयनराजेंनी आघाडीवर साधला निशाणा

Satara
udayan raje bhosle
उदयनराजे भोसले

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्यासाठी उदयनराजे यांनी गुरूवारी साताऱ्यात प्रचारसभा घेतली. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी प्रचार सभा घेतली यावेळी ते बोलत होते. राजेंच्या या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात दाखल झाले आहेत. यावेळी काँग्रेसच्या काळात फक्त मूठभर लोकांची सत्ता असल्याची टीका प्रचारसभेदरम्यान काँग्रेसवर उदयनराजे केली आहे. तसेच काँग्रेसची सत्ता असतांना त्यांच्यात अहंकार असून काँग्रेसने फक्त घोषणाबाजी करत कोणताच विकास केला नाही, असे वक्तव्य केले. तसेच काँग्रेस पक्षाने फक्त राजकारण केलं असून या दरम्यान सत्ताकारण केल्याचे दिसलेच नाही, अशी आघाडीवर राजेंनी सडकून टीका केली.

यावेळी, मोदींच्या दूरदृष्टीमुळे सर्वत्र देशाचा विकास झाला असल्याचे उदयनराजेंनी आपल्या प्रचारसभेदरम्यान उपस्थितीतांना सांगितले.


मोदींची उदयनराजेंसाठी साताऱ्यात पहिली सभा