घरदेश-विदेशउद्धव ठाकरे बेस्ट ऑफ फाईव्ह

उद्धव ठाकरे बेस्ट ऑफ फाईव्ह

Subscribe

सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत पाचवे स्थान

मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना सर्वोत्तम कारभार करणार्‍या मुख्यमंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी हॅट्ट्रिक केली आहे. सलग तिसर्‍यांदा हा मान मिळवण्याचा नावलौकिक त्यांनी केला आहे.

नुकतेच ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन 2020’ एमओटीएनच्या सर्वेक्षणानुसार योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. सलग तिसर्‍यांदा ‘सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री’ ठरण्याचा मान त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मात्र सातव्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे.

- Advertisement -

या सर्वेक्षणाअंतर्गत योगी आदित्यनाथ यांना एकूण 24 टक्के मते मिळाली आहेत. याआधीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत यंदा त्यांना जास्त मते मिळाली आहेत. त्यांच्या मतांमध्ये यावेळी सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले जात आहे. असे असूनही योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर लोकांनी समाधान व्यक्त केले. राज्यात नुकत्याच झालेल्या अपहरण आणि खुनाच्या घटना घडूनही आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारला जनता पाठिंबा दर्शवत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मात्र ७ टक्के मतांसह सातव्या क्रमांकावरच पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात आघाडीवर असणार्‍या सात मुख्यमंत्र्यांपैकी सहा मुख्यमंत्री हे काँग्रेस किंवा भाजपचे नाहीत. दुसर्‍या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. त्यांना 15 टक्के मते मिळाली आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे 11 टक्के मतांसह तिसर्‍या क्रमांकावर आहेत. ममता बॅनर्जी यांनी चौथा क्रमांक पटकावला आहे. त्यांना 9 टक्के मते मिळाली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -