घरमहाराष्ट्रमला विकासकामांचा प्राधान्यक्रम लावायचा आहे - मुख्यमंत्री

मला विकासकामांचा प्राधान्यक्रम लावायचा आहे – मुख्यमंत्री

Subscribe

उद्धव ठाकरे सरकारचं बहुमत सिद्ध करण्यासाठी आणि विधानसभा अध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करण्यासाठी बोलावण्यात आलेलं विधिमंडळाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन संपलं आहे. या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये भविष्यकाळात विरोधकांना शिंगावर घेण्याची तयारी असल्याचं सांगितल्यामुळे १५ दिवसांत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये काय होईल, याची चुणूक या अधिवेशनात दिसून आली. अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या विकासकामांसदर्भात ठाकरे सरकारची कशी वाटचाल असणार? याविषयी माहिती दिली आहे. ‘राज्यभरात सध्या सुरू असलेल्या विकासकामांची माहिती आपण मागवली आहे’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘विकासकामांचा लेखाजोखा मंत्रिमंडळासमोर’

‘राज्यात विकासकामं किती, कोणती आणि कुठे चालली आहेत. त्याच्यावर प्रस्तावित खर्च किती आहे. ती कधी पूर्ण होणार याची मी माहिती मागवली आहे. त्याचा प्राधान्यक्रम मला लावायचा आहे. त्यासाठी मी हा लेखाजोखा मी मंत्रिमंडळासमोर आणण्याच्या सूचना दिल्या आहेत’, असं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

‘आरेवर उगीच आक्षेप नाही’

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरेविषयीची भूमिका स्पष्ट केली. ‘आरेमध्ये कामाला स्थगिती दिल्यापासून तिथलं काम बंद आहे. आरे कारशेड वगळता कोणत्याही इतर कामासाठी स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे फक्त आरेमधल्या कामाला स्थगिती आहे. आरेवर फक्त आक्षेप घ्यायचा म्हणून घेतलेला नाही’, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, ‘बुलेट ट्रेनसंदर्भातल्या मुद्द्यांचा आढावा घेऊ’, असं त्यांनी नमूद केलं.


हेही वाचा – फडणवीसांची विधानसभेत शायरी; म्हणे, ‘मैं समुंदर हूँ’! भुजबळांनाही टोला!

अर्थव्यवस्थेविषयी श्वेतपत्रिका काढणार – छगन भुजबळ

दरम्यान, ‘राज्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती मागवण्यात आलेली आहे. जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करायची आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या स्थितीविषयी श्वेतपत्रिका काढू’, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमधील मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -