घरमहाराष्ट्रशिरुरमध्ये विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा; उद्धव ठाकरेंचा अमोल कोल्हेंना टोला

शिरुरमध्ये विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा; उद्धव ठाकरेंचा अमोल कोल्हेंना टोला

Subscribe

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांची आज घरवापसी झाली. आपल्या कार्यकर्त्यांसहीत त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेमध्ये फक्त वाघच राहू शकतात, असे सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की जुन्नर-शिरुर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून लोकसभा आणि विधानसभेत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा, असा आदेशच शिवसैनिकांना दिला. तसेच शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अमोल कोल्हेंना देखील टोला लगावला.

“जुन्नर-शिरूर हा परिसर आपलाच आहे. शरद सोनवणे शिवसेनेबाहेर गेले असले तरी त्यांच्या मनात फक्त भगवा होता. घरात थोडे रुसवे फुगवे होत असतात, म्हणून कुणी घर पाडत नाही. मात्र युतीचा भगवा उतरवण्यासाठी काही नतद्रष्ट लोक एकत्र आली आहेत. शिरुर लोकसभेत डिपॉझिट जप्त करणारा विजय पाहीजे. म्हणजे पुढच्या निवडणुकीत कुणीही शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात जाण्याचा विचार नाही केला पाहीजे”, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

…म्हणून युती केली

शिरुरच्या जागेवरून कोल्हेंवर शरसंधाण साधत असतानाच उद्धव ठाकरे यांनी आघाडीवरही टीका केली. अविचारी लोकांचे सरकार येऊ नये, म्हणून शिवसेनेने युती केली. नाहीतर आपल्या डोक्यावर अविचारी लोकांचे सरकार बसले असते. भांडणाचे विषय सुटणार असतील तर खडाखडी कशाला करायची? म्हणून आपण युती केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

स्वगृही परतल्याचा आनंद – सोनवणे

दरम्यान मला मनसेमध्ये असताना राज ठाकरे यांनी सन्मान दिला. उद्या मला कुणीतरी विचारेल तुम्ही मनसे का सोडली तर मी अजिबात मनसेवर नाराज नाही मला स्वगृही परतायचे होते म्हणून आज शिवसेनेत प्रवेश केला असे शरद सोनवणे यांनी सागितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -